ब्रिटीशकालीन धरणाच्या पायथ्याशी पर्यटनस्थळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटीशकालीन धरणाच्या पायथ्याशी पर्यटनस्थळ
ब्रिटीशकालीन धरणाच्या पायथ्याशी पर्यटनस्थळ

ब्रिटीशकालीन धरणाच्या पायथ्याशी पर्यटनस्थळ

sakal_logo
By

वाशी, ता. २६ (बातमीदार) : दिघा येथील इलठणपाडा परिसरात असणाऱ्या ब्रिटिशकालीन धरणाच्या पायथ्याशी वन विभागाकडून पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाच्या भिंतीजवळ वॉच टॉवर उभारून तीन एकर परिसरात निसर्ग उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत परिसरात वृक्षलागवडीसह नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूला भिंत बांधण्याचे कामही सुरू केले आहे.

डोंगराच्या कुशीत बांधलेल्या या धरणामध्ये वर्षभर पाणीसाठा उपलब्ध असतो. या परिसरात निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करावे, अशी मागणी अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत आहेत. महापालिकाही अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी तरतूद करत असते; परंतु धरण व परिसरातील जमीन हस्तांतर झाले नसल्यामुळे महापालिकेला या परिसरात विकासकामे करता आली नाहीत. धरणाच्या भिंतीची डागडुजी रेल्वेने केली आहे. धरण भरल्यानंतर आतील पाणी नैसर्गिक नाल्यातून खाडीच्या दिशेने जाते. या नाल्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांना बसता येईल, अशा प्रकारे तीन टप्प्यात भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे.

मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय पावसाळ्यात शेकडो वृक्षांच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे. दिघा परिसरात पालिकेचे फक्त एकच उद्यान आहे. यामुळे नागरिकांना मुलांना विरंगुळ्यासाठी उद्यानांचा आश्रय घ्यावा लागतो.

धरणाच्या सुरक्षेसाठीही मदत
ब्रिटिशकालीन धरणाच्या जवळचा परिसरात विकसित करण्यासाठी पालिकेनेदेखील मागणी केली होती; पण आता वनविभागच या जागेचा कायापालट करत आहे. या धरणामुळे नवी मुंबईच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे. वॉच टॉवरमुळे परिसरातील हालचालीवर लक्ष ठेऊन धरणाच्या सुरक्षेसाठीही त्याचा उपयोग होणार आहे.

धरण परिसरातील वन विभागाच्या जागेवरील तीन एकर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. या जमिनीवर डोंगराच्या उताराकडील भागात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात येत असून नाल्याभोवती संरक्षण कठडा व इतर अनेक कामे करण्यात येणार आहेत.
- नरेंद्र मुठे,
वनसंरक्षक अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83636 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top