जलतरण स्पर्धेत मायलेकीने पटकावले पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण स्पर्धेत मायलेकीने पटकावले पदक
जलतरण स्पर्धेत मायलेकीने पटकावले पदक

जलतरण स्पर्धेत मायलेकीने पटकावले पदक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : जनरल कुमार वैद्य जलतरण चेंबूरतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत घाटकोपरच्या मायलेकीने पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत आचाल अमन खाडे हिने सुवर्णपदक पटकावले असून, एकूण तीन पदके देऊन तिचा सन्‍मान करण्यात आला. १ फ्री स्टाईल, २ ब्रेक स्ट्रोक, ३ बॅक स्ट्रोकसाठी तिला गौरवण्‍यात आले. त्याचप्रमाणे तिची आई पूजा अमन खाडे हिने जलतरणच्या दोन स्पर्धेमध्ये दोन पदके पटकावली. एक सिल्वर आणि दुसरे ब्राँझ पदक देऊन तिचाही गौरव करण्यात आला. या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. फ्रीस्टाईल व ब्रेक स्ट्रोक या जलतरण स्पर्धेत भाग घेऊन पदक मिळविल्याबद्दल या मायलेकीवर घाटकोपरमध्ये कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या मायलेकीने पुढे जाऊन महाराष्ट्रासाठी खेळायचे व पदक मिळवायचे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83646 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top