नालासोपाऱ्यात भाजपचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालासोपाऱ्यात भाजपचे आंदोलन
नालासोपाऱ्यात भाजपचे आंदोलन

नालासोपाऱ्यात भाजपचे आंदोलन

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २६ (बातमीदार) : नालासोपाऱ्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारविरोधात पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी बुधवारी आंदोलन केले. नालासोपरा पूर्व मार्टिन सर्कल लिंक रोडवर हे आंदोलन केले आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती; पण राज्य सरकारने केलेली घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही. राज्य सरकारची घोषणा ही फसवी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्य सरकारने ६ ते ७ रुपयांनी कमी करावेत. जोपर्यंत राज्य सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार, असे भाजपचे वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83685 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top