कुर्ला येथील पादचारी पुलाच्या कामावरून श्रेयवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ला येथील पादचारी पुलाच्या कामावरून श्रेयवाद
कुर्ला येथील पादचारी पुलाच्या कामावरून श्रेयवाद

कुर्ला येथील पादचारी पुलाच्या कामावरून श्रेयवाद

sakal_logo
By

चेंबूर, ता. ३० (बातमीदार) : चेंबूर-सांताक्रूझ जोडरस्त्यवरून कुर्ला परिसरातील साबळे नगर, क्रांती नगरला जोडणारा पादचारी पूल नव्याने बांधण्यात आलेला आहे. या एकाच कामाचे श्रेय घेण्याकरिता आमदार व नगरसेविका यांनी आपापल्या निधीतून काम झाल्याचा स्‍वतंत्र फलक पुलावर लावलेला आहे. मात्र पुलाच्‍या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना पक्षातर्गत वाद चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे.
कुर्ला मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आहेत. या विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. १६९ मध्ये शिवसेनेच्या नगरसेविका प्रवीणा मोरजकर आहेत. चेंबूर सांताक्रूझ जोडरस्त्यावरून या नगरात जाण्याकरिता पादचारी पूल बांधावा, याकरिता स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार नगरसेविकेने २०१९ रोजी पालिका व रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार पालिकेने एक कोटी २९ लाख ४२ हजार १२५ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पालिका व रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पादचारी पूल बांधण्यात आला.
मात्र, सध्या या पादचारी पुलाचे श्रेय घेण्याकरिता लावण्यात आलेल्या फलकावरून नक्की काम कोणी केले, असा प्रश्‍‍न नागरिकांना पडलेला आहे. हे काम माझ्या प्रयत्नाने झाले असल्याचा फलक प्रथम स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी लावलेला असताना दुसरा फलक शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी लावला आहे. त्यामुळे नक्की कोणाच्या प्रयत्नाने पुलाचे काम झाले, या संभ्रमात येथील लोक आहेत.
फलकबाजीमुळे चर्चेला उधाण
आमदार व नगरसेविका दोघेही एकाच पक्षाचे असताना श्रेयावरून लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या फलकबाजीमुळे चर्चेला उधाण आलेले आहे. या दोघांच्या फलकबाजीमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बुधवारी दुपारी आमदार मंगेश कुडाळकर यांनी लावलेला फलक कार्यकर्त्यांनी काढला.

कोट
पालिका व रेल्वेबरोबर पत्रव्यवहार करून निधी मंजूर करून घेतलेला आहे. याबाबत पाठपुरवठा केलेला पत्रव्यवहार प्रत माझ्याकडे आहे. काम सुरू होऊन काही दिवसाकरिता बंद झाले होते. ते पुन्हा काम सुरू करून घेतले.
- प्रवीणा मोरजकर, नगरसेविका, शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83688 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top