
वसईतील एकाच परिसरातील चार सोसायट्यांमध्ये चोरी
नालासोपारा, ता. २६ (बातमीदार) : वसईच्या अग्रवाल या उच्चभ्रू वस्तीत एकाच दिवसात आजूबाजूच्या ४ सोसायट्यांमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याचे समोर आले आहे. दोन चोरटे खुलेआम मोटारसायकलवर येतात. सोसायटीच्या नोंदवहीमध्ये ८ अंकी चुकीचा मोबाईल नंबर टाकून सोसायटीमध्ये प्रवेश करतात आणि चोरी करून फरारी होतात. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्य कैद झाला आहे. चोरीच्या घटना सोमवारी (ता. २३) घडल्या आहेत.
वसई पश्चिम अग्रवाल हे उच्चभ्रू वस्तीचे कॉम्प्लेक्स आहे. या परिसरात सर्व व्यावसायिक, अधिकारी राहतात. या सोसायटीमधील कॉमन टॉयलेटमधील नळही महागडे असतात. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने सोमवारी २३ मे रोजी मोटारसायकलवर येत सोसायटीमधील कॉमन टॉयलेटमधील नळ चोरून बॅगेत भरून फरारी झाले आहेत.
अग्रवाल परिसरातील कौल हेरिटेज, इम्परेस टॉवर, किंग स्टोन टॉवर, जास्मिन बिल्डिंग, ओलिव बिल्डिंग या उच्चभ्रू सोसायटीतील कॉमन टॉयलेटमधील नळ आणि कॉकची चोरी केली आहे. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83696 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..