बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक
बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक

बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक

sakal_logo
By

वाशी, ता. २६ (बातमीदार) : सरकारचा कर चुकविण्याच्या उद्देशाने दुसऱ्या वाहनांची नंबर प्लेट लावून शालेय बस वाहतूक करण्याचा प्रकार नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन तपासणी दरम्यान समोर आला आहे. या बसचा वाहन मालक सुनील मथाने याच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने वाशी अरेंजा सर्कल येथे कोपरीगाव सिग्नलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर (एमएच ०४ जेके ९२९३) तपासणी केली. या बसमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची परवानगी नसतानाही या बसमध्ये वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे ही बस आरटीओकडून जप्त करण्यात आली. या बसचा ई चलान मशीनद्वारे तपासणी केला असता या नंबरच्या चेसीस क्रमाकांमध्ये फरक असल्याचे दिसून आला. पण या दोन्ही नंबरच्या वाहनांची तपासणी करता या वाहनांचा मालक सुनील मथाने हा आढळून आला. सरकारचा कर चुकविण्याच्या उद्देशाने सुनील याने ज्या वाहनांचा कर भरलेला आहे, त्या वाहनांची नंबर प्लेट ही दुसऱ्या वाहनांवर लावून बेकायदेशीर प्रवास करत होता. कर थकीत असणाऱ्या वाहनांची रक्कम ही दोन लाख ९४ हजार ९५२ रुपये आहे. वाशी आरटीओच्या तपासणी पथकाने हा प्रकार समोर आणला आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83721 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top