
वर्षभरात १,२६४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने श्वान नियंत्रण उपक्रम सुरू केला आहे. मे २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत तब्बल सात हजार ५०८ कुत्री पकडली असून त्यामधील एक हजार २६४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे; तर सहा हजार २५८ कुत्र्यांवर उपचार करण्यात आले. शहरातील जवळपास ९० टक्के भटक्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. रात्री अनेक रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत पाहावयास मिळते. कुत्रे मागे लागल्यामुळे मोटरसायकलचे अपघात होण्याच्या घटनाही होत आहेत. नवी मुंबई महापालिकेने २००६ पासून श्वान नियंत्रण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. इन डिफेन्स ऑफ ॲनिमल संस्थेला हे काम देण्यात आले होते. कोपरीमधील केंद्र मोडकळीस आल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात श्वान नियंत्रण केंद्र उभारून तेथे हे काम सुरू केले आहे. २०१४ पासून श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात आली आहे. तुर्भेमधील केंद्रामध्ये सुरुवातीला ३०० ते ५०० श्वानांवर शस्त्रक्रिया केली जात होती. आता शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे.
नवी मुंबईत शस्त्रक्रियेसाठी आता श्वान पुरेशा प्रमाणात सापडत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये महिन्याला १३० च्या दरम्यान शस्त्रक्रिया होत आहेत. महापालिकेने समान काम, समान वेतन नियमाप्रमाणे श्वान नियंत्रण उपक्रमासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे अधिक गतीने हे काम करणे शक्य होत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीतही शस्त्रक्रिया
लॉकडाऊनच्या कालावधीतदेखील ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली होती. कोरोना काळातदेखील दर महिन्याला १३० हून अधिक नसबंदीच्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. तसेच भटक्या कुत्र्यांशिवाय जखमी कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर औषधोपचार केले जात होते.
जानेवारी २०२१ ते मार्च २०२२
महिना कुत्रे पकडले नसबंदी उपचार
मे २०२१ ६९२ ९४ ५९५
जून २०२१ ६२५ ११३ ५२१
जुलै २०२१ ६२९ १२८ ४९८
ऑगस्ट २०२१ ६४३ १२४ ५२४
सप्टेंबर २०२१ ६०६ १०१ ५०३
ऑक्टोबर २०२१ ६७९ ११७ ५५९
नोव्हेंबर २०२१ ५४९ ८२ ४७४
डिसेंबर २०२१ ६२० १३४ ४८२
जानेवारी २०२२ ६२५ १३० ४८३
फेब्रुवारी २०२२ ५४९ ११३ ४४८
मार्च २०२२ ६७४ ८९ ५९२
एप्रिल २०२२ ६१७ ३९ ५७९
एकूण ७५०८ १२६४ ६२५८
निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम ही सातत्याने सुरूच असते. तसेच महापालिकेकडून जखमी कुत्र्यांवर उपचारदेखील केले जात आहेत.
- डॉ. श्रीराम पवार, पशू वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83724 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..