एक कोटींच्या रकमेसह सोन्याची बिस्किटे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक कोटींच्या रकमेसह सोन्याची बिस्किटे जप्त
एक कोटींच्या रकमेसह सोन्याची बिस्किटे जप्त

एक कोटींच्या रकमेसह सोन्याची बिस्किटे जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २६ - हैद्राबाद येथून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे आरपीएफ व सीआयबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक कोटी एक लाख ५५ हजारांची रोकड आणि नऊ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. गणेश भगत, मयूर कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटे व पैसे कुठून आली याचा तपास पोलिस करीत आहेत.
रेल्वे मार्गाने होणाऱ्या अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. बुधवारी (ता. २५) हैद्राबादहुन मुंबईत देवगिरी एक्सप्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कल्याण स्थानकात सापळा रचला होता. आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांना तीन वेगवेगळ्या बोगीमध्ये पाच जण संशयास्पदरित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता हा ऐवज मिळून आला.

कुरिअरद्वारे पार्सल
पाचही जणांनी आपण वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांसाठी नांदेड, औरंगाबाद, परभणीमध्ये काम आहोत. मस्जिद बंदरमधील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83735 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top