बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी
बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) ः यावर्षी पाऊस लवकर पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे संपवून तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी बी-बियाण्यांची खरेदी करत आहेत. त्यामुळे विक्रमगडमधील कृषी सेवा केंद्रांवर खते, बी - बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

पाऊस समाधानकारक होईल, या आशेने शेतकरी बी-बियाणे, खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. विक्रमगड शहरात एकूण सात ते आठ कृषी सेवा केंद्रे; तर तालुक्यात एकूण १४-१५ कृषी सेवा केंद्रे आहेत. नेहमीप्रमाणे भात बी-बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर उडीद, तूर व भाजीपाला पिकांच्या बियाण्यांच्या किमतीही पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत केली असून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. साधारणपणे खरीप हंगामात भात पीक, नागली व भाजीपाला अशी पिके घेतली जातात. भाजीपाला पिके कमी कालावधीत पैसे मिळवून देणारे पिक आहे; तर भातपीक हे शेतकऱ्यांसाठी वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन आहे; तर भाजीपाल्यामध्ये मेथी, कोंथिबीर, दोडके, घोसाळे, मिरची, काकडी इत्यादी पिके घेतली जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83738 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top