
आतापर्यंत सहा कोटींचा घोटाळा उघड आत्तापर्यंत ६ कोटींचा घोटाळा उघड आत्तापर्यंत ६ कोटींचा घोटाळा उघड आत्तापर्यंत ६ कोटींचा घोटाळा उघड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली असून ६ कोटींचा घोटाळा आतापर्यंत उघडकीस आला आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. साधारण ११ ते १२ शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून यात काही मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. यात आणखी शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाचा धरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प उभा राहण्याआधीच भूसंपादन मोबदला घोटाळ्यामुळे चर्चेत आला आहे. भूसंपादन प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील मोबदला वाटपातच हा घोटाळा झाल्याने पुढील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी प्रांत कार्यालयाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे; तर उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दाखल गुन्ह्यानुसार १० ते १२ शेतकऱ्यांची सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये आणखी शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
---
फसवणूक झालेले शेतकरी व रक्कम
* नामा हाल्या पाटील- १ लाख २४ हजार १७७
* नामा हाल्या पाटील - ११ लाख ८३ हजार ८२३
* शंकर हाल्या पाटील - १४ लाख ३ हजार २०३
* नारायण नामा म्हात्रे - १३ लाख ४१ हजार ११४
* रामा धर्मा बांगर (मयत) - ६ लाख ७२ हजार ६२७
* कृष्णा नसिंगराव पिपळे - ३ कोटी ८४ लाख ९६८
* सुरेशकुमार नरसिगाराव पिपळे - ९४ कोटी ६४ हजार ८१४
* मंगला जानू चिडा (मयत), सीता धोंडू पारधी, पांगो जानू चिडा - १६ लाख ५९ हजार ८३६
* नाथा दूदा भाग्यवंत - ६० लाख १ हजार ९००
----------
एकास अटक
आंभे गावातील अनिल भाग्यवंत हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर या आधीही गुन्हे दाखल आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत आणि पोलिसांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे समोर येत आहे. तसेच त्याने अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस तपासात अनिल यांच्याकडून काय धागेदोरे हाती लागतात हे पाहावे लागेल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83739 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..