वाघोबा खिंडीत बस दरीत कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोबा खिंडीत बस दरीत कोसळली
वाघोबा खिंडीत बस दरीत कोसळली

वाघोबा खिंडीत बस दरीत कोसळली

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) ः पालघर येथील वाघोबा खिंडीत एसटी महामंडळाच्या रातराणी बसचा आज (ता. २७) सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस खोल दरीत कोसळली. यात १५ प्रवासी जखमी झाले. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पालघर आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी दिली.

भुसावळहून बोईसरला निघालेली ही बस पालघर येथील वाघोबा खिंडीजवळ येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस दरीत कोसळली. बसमध्ये लहान मुलांसह पंधरापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. बस दरीत कोसळल्यामुळे १५ प्रवासी जखमी झाले. त्यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिस, महसूल, आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमी प्रवासी पालघर ग्रामीण रुग्णालयात; तर काही पालघरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बसचालकाने दारूचे सेवन केले होते. त्यामुळे नाशिक येथे त्याला बस चालवण्यास मज्जाव केला होता, अशी माहिती एका प्रवाशाने दिली; पण चालक व्यवस्थित गाडी चालवेल, अशी हमी वाहकाने दिल्याचे प्रवाशाने सांगितले. घटनास्थळी पंचनामा करून दरीत पडलेली एसटी काढण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83774 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top