समीर वानखेडेंवर कारवाई होणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समीर वानखेडेंवर कारवाई होणार का?
समीर वानखेडेंवर कारवाई होणार का?

समीर वानखेडेंवर कारवाई होणार का?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान याला न्यायालयाने क्लिन चीट दिल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार की त्यांना वाचवणार, असा सवाल विचारला आहे. मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. आर्यन खान आणि इतर ५ संशयितांना अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले आहे. आता एनसीबी समीर वानखेडे आणि त्याच्या खासगी वसुली पथकावर कारवाई करणार का? की दोषींना वाचवणार, असा प्रश्न नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅँडलवरून विचारण्यात आला आहे. ‘फर्जीवाडा एक्पोज'' हा हॅशटॅग वापरून हे ट्विट करण्यात आले आहे. एनसीबीच्या मुंबई परिमंडळ संचालक पदावर असताना समीर वानखेडे यांनी ऑक्टोबरमध्ये एका क्रूझवर छापेमारी केली होती. छापा टाकून त्यांनी सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली होती. आर्यन खान यात असल्यामुळे ही केस हाय प्रोफाईल ठरली. हा छापा म्हणजे फर्जीवाडा असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांच्या धारदार आरोपानंतर वानखेडे यांना या पदावरून हटवण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83794 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top