पश्‍चिम उपनगरात ३१ मे ते १ जून पाणीकपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्‍चिम उपनगरात ३१ मे ते १ जून पाणीकपात
पश्‍चिम उपनगरात ३१ मे ते १ जून पाणीकपात

पश्‍चिम उपनगरात ३१ मे ते १ जून पाणीकपात

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबई पालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिमी जलवाहिनीसह १५०० मिमी जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासह ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिमी जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन बुधवारी (ता.१) सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीत आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व), आर/मध्य विभागातील बोरिवली (पूर्व), आर/उत्तर विभागातील दहिसर (पूर्व) आणि पी/उत्तर विभागातील मालाड (पूर्व) परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कारणाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83800 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top