दोन लाख उंदरांचा खात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाख उंदरांचा खात्मा
दोन लाख उंदरांचा खात्मा

दोन लाख उंदरांचा खात्मा

sakal_logo
By

तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : लेप्टोस्पायरोसिससारखा जीवघेणा आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल दोन लाख उंदरांचा खात्मा नवी मुंबई महापालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाने केला आहे. मूषक नियंत्रण विभागाच्या मोहिमेअंतर्गत वर्षभरात ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईत उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उंदरांमुळे नवी मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे; तर पालिकेने उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मूषक नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. वाढत्या उंदरांच्या संख्येला आळा बसवण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून त्याअंतर्गत पालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १ लाख ९६ हजार ११७ उंदरांचा खात्मा केला आहे. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे.
झोपडपट्टी किंवा गावठाणामध्ये गटारात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, घुशीला खाद्य मिळते. त्यामुळे उंदीर, घुशीचे प्रमाण झोपडपट्टी व गावठाण भागात अधिक आहे. विविध औषधांचा वापर करून त्यांचा खात्मा करण्यात येतो; तर पिंजरे, ग्ल्यूटेप, धुरीकरण करूनही उंदरांना मारले जाते. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
...
चार लाख बिळे निर्जीव...
मूषक विभाग नियंत्रण विभागाकडून ४ लाख २९ हजार १९६ बिळात धुरीकरण करण्यात आले असून विशेष म्हणजे एका बिळात उंदराची १८ पिळावर असल्याने त्याचाही या धुरीकरणामुळे खात्मा होतो. धुरीकरण आणि औषधांचा वापर करून ४ लाख १३ हजार बिळे निर्जीव करण्यात आली. याशिवाय शहरातील आठ विभागांत ५ हजार २५ पिंजरे लावून उंदीर पकडण्यात आले; तर मूषक नियंत्रण मोहिमेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला दोन लाख २३ हजार ५८० रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी दिली.
...
कोपरखैरणे ७४ हजार मृत मूषक आढळले, तर घणसोली विभागातून ४९ हजार ४२० इतका दंड ठेकेदाराकडून वसूल करण्यात आला. उंदीर-घुशीची वाढती संख्या नवी मुंबईकरांना डोकेदुखी झाली आहे. कचराकुंड्यामुक्त नवी मुंबई झाली असली तरी मूषकमुक्त नवी मुंबई मात्र अद्याप झालेली नाही. आधी कचऱ्याच्या कुंड्यांवर उंदीर-घुशी वाढत होत्या, आता मात्र भूमिगत गटारे व मलनिस्सारण वाहिन्यांत उंदीर व घुशींनी आपला घरोबा केला आहे.
...
आठ विभागांतील तपशील
धुरीकरण - ४ लाख २९ हजार १९६
निर्जीव बिळे - ४ लाख १३ हजार
मृत उंदीर - १ लाख ९६ हजार ११७
पिंजरे संख्या - ५ हजार २५
पिंजऱ्यात सापडलेले उंदीर - १ हजार ७६२
दंड - २ लाख २३ हजार ५८०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83806 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top