उसने पैशांची मागणी केल्याने मित्राची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसने पैशांची मागणी केल्याने मित्राची हत्या
उसने पैशांची मागणी केल्याने मित्राची हत्या

उसने पैशांची मागणी केल्याने मित्राची हत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून कोपरखैरणेत राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूहल्ला करून त्याची हत्या केली. कोपरखैरणे पोलिसांनी आरोपी शंकर भंडारे (वय २३) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील मृत तरुणाचे नाव सूरज वैश्य (वय २७) असे असून तो कोपरखैरणे सेक्टर-१९ मध्ये राहण्यास होता. तसेच शंकर भंडारे हादेखील कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये एकटाच राहण्यास होता. काही दिवसांपूर्वी सूरजने शंकरला काही रुपये उसने दिले होते. मात्र शंकर उसने पैसे देत नव्हता. २४ मे रोजी रात्री सूरज कोपरखैरणेतील शाळा क्र. ३६ च्या पाठीमागील रस्त्याने जात असताना त्याला शंकर भेटला. त्यामुळे सूरजने त्याच्याकडे त्याने उसने दिलेल्या पैशांची मागणी केली. या गोष्टीचा शंकरला राग आल्याने त्याने सूरजला शिवीगाळ करून त्याच्यासोबत वादावादी केली. त्याचवेळी शंकरने आपल्याजवळ असलेला चाकू सूरजच्या मांडीमध्ये मारून पलायन केले. शंकरने केलेल्या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जास्त रक्तस्राव झाल्यामुळे काही वेळात त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83827 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top