उत्तन येथे तेरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तन येथे तेरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
उत्तन येथे तेरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

उत्तन येथे तेरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

sakal_logo
By

भाईंदर, ता. २८ (बातमीदार): उत्तन येथील डोंगर परिसरात असलेल्या तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. अनिल झरपाला हा तेरावर्षीय मुलगा सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत तलावाजवळ खेळत होता. यावेळी पाय घसरून तो तलावात पडला. मित्रांनी आरडाओरड करून आसपासच्या लोकांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनिल तलावात नाहीसा झाला होता. तलाव खोल असल्यामुळे मुलाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा मुलाचा मृतदेह हाती लागला. हा तलाव धोकादायक असून दरवर्षी याठिकाणी अपघात होत असतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83869 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top