सफाई कामगारांचा संप मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगारांचा संप मागे
सफाई कामगारांचा संप मागे

सफाई कामगारांचा संप मागे

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) ः प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्याच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे लेखी आश्वासन नगरपालिका प्रशासनाने दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला अंबरनाथ नगरपालिका सफाई कामगारांचा संप त्यांनी शनिवारी मागे घेतला आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या सुमारे ४५० सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे युनिट अध्यक्ष जोगेंद्र जाजोट यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (ता. २५) पासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले होते, यामुळे रस्त्यावरील सफाईची समस्या निर्माण झाली होती. संपात तोडगा निघण्यासाठी प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या चर्चेत आस्थापना विभाग प्रमुख संदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टाक, युनिट अध्यक्ष जाजोट, आरोग्य विभागप्रमुख सुरेश पाटील आदी सहभागी झाले होते.
कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या ३१ कोटी रुपयांची रक्कम पालिकेला उपलब्ध व्हावी यासाठी संचालक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. ७ जून २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे, तसेच अन्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याने सुरू असलेले कामगारांचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यानंतर कर्मचारी आज शनिवारी कामावर रुजू झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83876 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top