गायीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
गायीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

गायीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे या मार्गावर दुचाकीवर मागे बसलेल्याचा अपघाती मृत्यू; तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) घडली आहे. मोबिन अहमद खान असे या मृत तरुणाचे नाव आहे. रस्त्यात गाय आडवी आल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. यातच मोबिन याचा मृत्यू झाला. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेरळ खांडा येथे राहणारा मोबिन खान हा शुक्रवारी (ता. २७) त्याच्या मित्रासह कशेळे येथून नेरळला येत होता. सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आंत्रट येथील रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकी गायीला धडकून समोरून येणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. या धडकेत मागे बसलेल्या मोबीनचा जागीच मृत्यू झाला; तर दुचाकीचालक लांब फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. या वेळी त्या गायीचादेखील मृत्यू झाल्याचे समजते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83878 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top