पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालिकांवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालिकांवर हल्ला
पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालिकांवर हल्ला

पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालिकांवर हल्ला

sakal_logo
By

रोहा, ता. २८ (बातमीदार) ः पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालिकांना चावा घेतल्याची घटना रोहे तालुक्यातील धानकान्हे या गावी घडली. दोघींनाही रोहे येथील शासकीय रुग्णालयात उपचार होऊ न शकल्याने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धानकान्हे येथील सचिन जाधव यांची मुलगी संस्कृती जाधव (वय ५ वर्षे) ही अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली; तर सचिन जाधव यांच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या राकेश कचरे यांची लहान मुलगी निधी कचरे हिच्यावरही कुत्र्याने हल्ला करून तिलाही जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालिकांना जबर जखमी केल्याने धानकान्हे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83879 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top