
पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला बेड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. आरोपीचे नाव अंसार अली उर्फ समीर (वय २७) असे आहे. २६ मे रोजी आरोपीने गोरेगाव पूर्वमधील संतोष नगर येथील राहत्या घरी पत्नीची गळा दाबून हत्या केली होती.
मूळचा उत्तर प्रदेशातील अंसार अली ऊर्फ समीर याने गोरेगाव इथे भाड्याची खोली घेतली. तेथे त्याने आपली पत्नी रोझी खातून हिचा २६ मे रोजी गळा दाबून हत्या केली होती. या घटनेनंतर तो उत्तर प्रदेशला पळून गेला. या घटनेनंतर घरमालक प्रमोद मौर्य याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे मोबाईल लोकेशन, परिसर आणि रेल्वेस्थानकावरील सीसी टीव्ही तपासले असता हा आरोपी छपरा एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशला पळून गेला असल्याचा संशय पोलिसांना आला. दिंडोशी पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके उत्तर प्रदेशला रवाना केली. रेल्वे गाडीत आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही, मात्र अखेरीस प्रयागराज रेल्वेस्थानकाच्या बाथरुममध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83895 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..