करकपातीविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करकपातीविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक
करकपातीविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक

करकपातीविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पेट्रोल, डिझेल दर कपातीविरोधात आता पेट्रोल पंप चालक-मालक आक्रमक झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून चुकीच्या पद्धतीने कर कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पंप चालक-मालकांनी ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पंप चालक इंधन खरेदी करणार नाहीत. तसेच पंपावर इंधनाचा साठा असेपर्यंतच ग्राहकांना पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. त्यामुळे मंगळवारी इंधनाची तूट निर्माण होऊ शकते.

गेल्या अडीच वर्षांत पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड अस्थिर होते. यादरम्यान इंधनाची सर्वाधिक दरवाढच झाली आहे. मात्र आता अचानक केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कर कपातीमुळे पंप चालक-मालकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले असल्याचा आरोप पंप चालक-मालक संघटनेकडून करण्यात आला आहे. पूर्वकल्पना किंवा कोणतेही नियोजन न करता कर कपात केल्याने पेट्रोल पंप चालक- मालकांमध्ये सरकारविरोधात नाराजी आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील पेट्रोल, डिझेल पंप चालक- मालक ‘नो पर्चेस''मध्ये सहभागी होण्याचे आवाहन फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे (फामपेडा) अध्यक्ष उदय लोध यांनी केले आहे. पंप चालकांच्या या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा कर स्वरूपात मिळणारा कोट्यवधींचा महसूल बुडणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83899 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top