भीषण आगीत ८ दुकाने जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण आगीत ८ दुकाने जळून खाक
भीषण आगीत ८ दुकाने जळून खाक

भीषण आगीत ८ दुकाने जळून खाक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना विरार पूर्व, मनवेल पाडा परिसरातील संतनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. या आगीत इतर आठ दुकाने जळून खाक झाली आहेत. तब्बल चार तासांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले; पण आज दिवसभर आग धुमसत होती. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे. ज्या फर्निचरच्या दुकानांना आग लागली ते अनधिकृत असल्याचे सांगितले जात आहे.

ही सर्व फर्निचरची दुकाने रस्त्याच्या कडेला लाकडी बांबूने बांधलेल्या गाळ्यात होती. लाकडी फर्निचर आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. बाजूलाच रहिवासी इमारती असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी घटनास्थळी पोहचून पालिकेच्या अग्निशमन दल, पोलिसांना याची माहिती दिली. दुकानाच्या आतमध्ये घरगुती गॅस सिलिंडर असल्याने त्यांचेही २ स्फोट झाले; पण याचे लोण बाजूच्या रहिवासी इमारतीपर्यंत पोहचले नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग विझवण्यासाठी ३० जवानांनी अथक परिश्रम करून पाण्याच्या चार बंबांनी आग विझविली आहे. यातील कुठल्याही दुकानात अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मनवेलपाडा परिसरात, मुख्य रस्त्यावर अशी अनेक अनधिकृत दुकाने थाटलेली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83905 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top