२५ वर्षांपेक्षा अधिक विनाअपघात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२५ वर्षांपेक्षा अधिक विनाअपघात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार
२५ वर्षांपेक्षा अधिक विनाअपघात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार

२५ वर्षांपेक्षा अधिक विनाअपघात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : एसटी महामंडळात २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा करणाऱ्या ३० चालकांचा सपत्नीक विशेष गौरव करण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाने घेतला आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाचा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने पुणे येथे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी एसटी महामंडळ अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या वेळी प्रत्येक विभागातील एक अशा एकूण ३० चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सत्कारासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुणे येथे एसटीचे ओळखपत्र, विनाअपघात सेवेचे बिल्ले व संपूर्ण गणवेशासह सपत्नीक हजर राहावयाचे आहे; तर अशा चालकांना कर्तव्यावरून कार्यमुक्त करण्याच्या सूचना संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, सपत्नीक प्रवासासाठी आवश्यकतेनुसार एसटी बसचा मोफत पाससुद्धा देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83906 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top