एमआयडीसीच्या आगीत १८ कोटींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीच्या आगीत १८ कोटींचे नुकसान
एमआयडीसीच्या आगीत १८ कोटींचे नुकसान

एमआयडीसीच्या आगीत १८ कोटींचे नुकसान

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : ६ मे रोजी खैरणे एमआयडीसीतील वेस्टकोस्ट पॉलिकेम या रबर कंपनीसह इतर ६ कंपन्यांना आग लागली होती. या आगीत कंपन्यांचे सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या आगीत चार कंपन्या पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या, तर इतर तीन कंपन्यांना आगीची झळ बसली होती. वेस्टकोस्ट पॉलिकेम या रबर कंपनीने आपल्या कंपनीत सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी अग्निशमन यंत्रणा लावली नसल्यामुळे कंपनीत आग लागून ही घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरत वेस्टकोस्ट पॉलिकेम कंपनीचे मालक उत्तम किशोरचंद झुनझुनवाला (५५) व भारतेंदु किशोरचंद झुनझुनवाला (४७) यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या आगीत मे. वेस्टकोस्ट पॉलिकेम प्रा.लिमिटेड या कंपनीचे मॅनेजर एन. एस. नायर व अभियंता निखिल पाशिलकर या दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आग आटोक्यात आणली होती. आगीत जळून खाक झालेल्या कंपन्यांचा तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केल असता, हिंद इलास्टर्मस प्रा.लि. (७ कोटी ४५ लाख), सोलंकी टी कंपनी (६ लाख २० हजार), टॉपीओक्स रिसर्च सेंटर प्रा.लि. (५ कोटी २१ लाख ), वेस्टकोस्ट पॉलिकेम कंपनी (१ कोटी २५ लाख), श्री नागणीवेस इंजिनियरिंग ॲण्ड सर्व्हीसेस (२ कोटी ४७ लाख), मे. कन्डोर्स फुड्स प्रा.लि. (१ कोटी २५ लाख ) व नवनाथ मिल्क ॲण्ड प्रॉडक्ट (३ लाख ७५ हजार) असे सुमारे १७ कोटी ७२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, वेस्टकोस्ट पॉलिकेम प्रा.लि. या कंपनीमध्ये फायर सिस्टीम अथवा अलार्म लावण्यात आले नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून आले. या कंपनीने आपल्या कंपनीच्या आवारात सभोवताली व स्टोअर रुममध्ये मोठ्या प्रमाणात रबराच्या मालाचा साठा करून ठेवला होता. तसेच हा माल ज्वलनशील असल्याचे माहीत असतानासुद्धा कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी अग्निशमन यंत्रणा लावली नसल्याचे आढळून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83909 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top