हेदोरावाडी पाड्यातील वीज, पाणी समस्या दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेदोरावाडी पाड्यातील वीज, पाणी समस्या दूर
हेदोरावाडी पाड्यातील वीज, पाणी समस्या दूर

हेदोरावाडी पाड्यातील वीज, पाणी समस्या दूर

sakal_logo
By

खारघर, ता. २९ (बातमीदार) : खारघरमधील हेदोरावाडी आदिवासी पाड्यात बंद असलेले पथदिवे आणि पाणी समस्या दूर करण्यात आल्याने स्थानिक समाधान व्यक्त करीत आहेत. या पथदिव्यांचे लोकार्पण शनिवारी (ता. २८) पार पडले. यावेळी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, परेश पाटील, रघुनाथ पाटील, रामचंद्र देवरे, बारवईचे सरपंच नीलेश बाबरे, मिथुन पाटील, तसेच वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

खारघर शहरात फणसवाडी, चाफेवाडी, बेलपाडा वाडी, हेदोरावाडी, धामोळे, घोलवाडी आदी पाडे आहेत. पाड्यातील समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडविली जात असे, मात्र पनवेल पालिका अस्तित्वात आल्यानंतर आदिवासीपाडे नागरी सुविधांपासून वंचित आहेत. युवा सेनेच्या प्रयत्नांमुळे पाड्यातील ग्रामस्थांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेत समस्या मांडल्या होत्या. यावेळी आयुक्तांनी आदिवासी पाड्यातील समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर पालिकेने हेदोरावाडी पाड्यातील वर्षभरापासून बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आलेत. तसेच मोटर दुरुस्ती करण्यात आल्याने पाड्यात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83928 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top