जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने एमओजीएसतर्फे जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने एमओजीएसतर्फे जनजागृती
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने एमओजीएसतर्फे जनजागृती

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने एमओजीएसतर्फे जनजागृती

sakal_logo
By

शिवडी, ता. २९ (बातमीदार) : फोर्ट येथील कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयामध्ये जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने एमओजीएसतर्फे शनिवारी (ता. २८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ए वॉर्डच्या आरोग्य अधिकारी प्राजक्ता आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मासिक पाळी स्वच्छता दिवसाचे महत्त्व, त्याचप्रमाणे ‘आम्ही वचनबद्ध आहोत’ ही या वर्षीची जी संकल्‍पना आहे, याविषयीचे स्पष्टीकरण आणि हा दिवस साजरा करण्याप्रती असलेली आपली जबाबदारी आणि जागरूकता यावर एमओजीएसचे अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. अपर्णा हेगडे व डॉ. अशोक आनंद आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओपीडी तसेच कम्युनिटीमध्ये जाऊन लोहयुक्त गोळ्यांचे, तसेच कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप करून मासिक पाळी स्वच्छतेविषयीचे मार्गदर्शन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83951 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top