
रिलायन्स हेल्थ ग्रेनचा ग्राहकांच्या पसंतीने विमा
मुंबई, ता. २९ ः ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार आणि गरजेनुसार आरोग्य विमा पॉलिसी निवडण्याची व तेवढाच हप्ता भरण्याची संधी रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसीमध्ये मिळणार आहे. यातील प्लस, पॉवर व प्राईम या तीन योजनांमध्ये तब्बल ३८ नवी वैशिष्ट्ये आहेत. या पॉलिसीत कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे विमाछत्र मिळणार असून तीन लाख रुपयांपर्यंतच्या विमाछत्रासाठी वयाची अट नाही, याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल.
जुन्या आजारांसाठीचे विमाछत्र लागू होण्यासाठी तीन ते एक वर्षाचा कालावधी ग्राहक निवडू शकता. तसेच फ्लोटर पॉलिसीत ग्राहकाच्या जवळच्या बारा नातलगांना विमा कवच मिळू शकेल. रुग्णालयातील खोलीच्या भाड्याची मर्यादाही वाढविण्यात आली असून दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण केल्यावर लॉयल्टी लाभ मिळेल, असे रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन म्हणाले. पन्नास वर्षांपर्यंतच्या ग्राहकांना पॉलिसी घेतेवेळी जुने आजार नसल्यास दोन तीन वर्षांच्या पॉलिसी हप्त्यांवर १५ टक्के सवलत मिळेल. महिलांसाठी या पॉलिसीत विशेष सवलत असून ही पॉलिसी महिला काढणार असल्यास किंवा ग्राहक मुलीची पॉलिसी काढणार असल्यास हप्त्यामध्ये पाच टक्के सवलत मिळेल. ग्राहक ज्या शहरात राहत असेल तेथील वैद्यकीय खर्चाप्रमाणे कमी-जास्त प्रीमिअम भरण्याची संधी त्याला मिळेल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83975 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..