पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले
पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले

पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले

sakal_logo
By

वाशी, ता. २९ (बातमीदार) : मे महिना संपत आला असून कोकणातील हापूस आंब्याचा हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांवरही आता शेवटच्या बहरातील फळे शिल्लक राहिली आहेत. त्यातच सध्या रत्नागिरी जिल्हात अधूनमधून पावसाचा शिडकावा होऊ लागला आहे आणि दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेवटच्या हंगामातील झाडावर असलेला आंबा अडचणीत आला आहे, असे व्यावसायिक सांगत आहेत.

आंब्याला पाणी लागले, तर आंबा खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणून हा आंबा सांभाळण्यासाठी बागायतदार शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या भीतीमुळे झाडावरील आंबा काढून तो पेटीत सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग आता वाढली आहे. आता कोकणात झाडावर हंगामातील शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. हा आंबा पिकत येण्यापूर्वी दोन ते तीन दिवसांनी खाली उतरवला जात आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या आठवड्यापासून अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. वातावरणही ढगाळ राहत आहे. पावसाचे थेंब पडून आंबा खराब होऊ शकतो. ढगाळ वातावरण असले, तरी आंब्यावर त्याचा परिणाम होत आहे, असे आंबा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

हंमागातील शेवटच्या दिवसातील आंबा चांगल्या स्थितीत बाजारात पाठवला तरच त्याचा फायदा होणार आहे. या वर्षी पाऊसही लवकर दाखल होणार आहे. त्यातच अधूनमधून शिडकावा होत आहे.
- रमेश जगताप, आंबा उत्पादक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83997 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top