आठवडाभरात ११८ कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवडाभरात ११८ कोरोना रुग्ण
आठवडाभरात ११८ कोरोना रुग्ण

आठवडाभरात ११८ कोरोना रुग्ण

sakal_logo
By

वाशी, ता. २९ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात असली, तरी मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत पालिका लक्ष ठेवून आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झाली असून शहरात १०६ सक्रिय रुग्ण आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून दिवसाला २० व त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने रुग्णसंख्या वाढताच तत्काळ खाटांची सुविधा करण्याची व्यवस्थाही केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या शहरातील एकमेव कोरोना उपचार केंद्र असलेले वाशी प्रदर्शनी केंद्रही बंद असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने नुकतीच या केंद्राची पाहणी केली असून कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास तत्काळ खाटांची सुविधा उपलब्ध करता येणार आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास तत्काळ सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मागील दोन महिन्यांपासून शहरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. शहरात आतापर्यंत जवळजवळ ३४,७६,६४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. एमएमआर क्षेत्रात व ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा संकट घोंघावत आहे की काय, अशी चिंता वाटू लागली आहे.

नवी मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा २० पर्यंत आली आहे.
- संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84002 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top