वाढवण बंदरप्रकरणी ८ जूनला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण बंदरप्रकरणी ८ जूनला सुनावणी
वाढवण बंदरप्रकरणी ८ जूनला सुनावणी

वाढवण बंदरप्रकरणी ८ जूनला सुनावणी

sakal_logo
By

डहाणू, ता. २९ (बातमीदार) : डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी ३० मे २०१७ रोजी वाढवण बंदर उभारणीस स्थगिती दिली होती. या आदेशावरील सुनावणी गेल्या आठवड्यात मंगळवारी (ता. २४) प्राधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती ए. बी. चौधरी यांनी ठेवली होती. या वेळी जेएनपीटी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्यामार्फत नव्याने दाखल केलेल्या तीन अर्जांवर ८ जून २०२२ रोजी सुनावणी ठेवून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाढवण बंदर उभारणीसंदर्भात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे बंदराचा प्रारूप विकास प्रकल्प आराखडा आठ दिवसांत सादर केला होता. तसेच बंदर परिसरात पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे कोणतेही कृत्य न करता, त्या ठिकाणी फावडाही लावण्यास देऊ नये, तसेच बंदर उभारणीस स्थगितीचे आदेश दिले होते. या आदेशावरील सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीदरम्यान वाढवण बंदर उभारणी करणाऱ्या जेएनपीटी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बंदर उभारणीसाठी लागणाऱ्या विविध अहवालांचा अंतिम प्रारूप विकास प्रकल्प अहवाल आराखडा (डीपीआर) प्राधिकरणांच्या अध्यक्षांसमोर सादर केला. त्याचबरोबरीने वाढवण बंदरासंदर्भात प्रशासनाने विचार करावा म्हणून, नव्याने तीन अर्ज दाखल केले. या अर्जांवर ८ जून २०२२ रोजी वाढवणविरोधी संघर्ष समिती आपले म्हणणे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

तीन नवीन अर्जात...
वाढवण बंदर उभारण्यास परवानगी नाकारणाऱ्या १९९८ च्या प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पुनरावलोकन करण्यात यावे, वाढवण बंदरासंदर्भातील प्रकरणांत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय खात्याला पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात यावे आणि वाढवण बंदरासंदर्भातील विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी परवानगी देण्यात यावी, आदी मागण्यांचे तीन नवे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84005 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top