पुन्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ
पुन्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ

पुन्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः अनेक महिन्यांनंतर कोविडने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील चार दिवसांमध्ये शहरात १०५ कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला चाचण्यांमध्ये वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णसंख्येचा आलेख असाच वाढता राहिल्यास जून महिन्यांत पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
कोविडच्या तिन्ही लाटांना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने समर्थपणे तोंड दिले आहे. रुग्णसंख्या कमी असल्यामुळे राज्य सरकारने सर्वच कोविड निर्बंध शिथिल केल्याने शहरात सर्व काही आलबेल सुरू आहे. पूर्वी तोंडावर मास्क लावण्यास केलेली सक्ती आता ऐच्छिक केली आहे. बाजारपेठांमध्ये होत असणाऱ्या गर्दीवरचे नियमही शिथिल असल्यामुळे गर्दीवर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत शहरात अवघ्या ४२ कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. आता या रुग्णांमध्ये लक्ष्यणीय वाढ झाल्यामुळे सद्यस्थितीत शहरात तब्बल १३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये शहरात रोज सरासरी २५ ते ३० रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण कोविड रुग्णांची संख्या कमी होत आल्याने महापालिका आयुक्तांनी शहरातील कोविड केअर केंद्र आणि कोविड रुग्णालये बंद केली आहेत; परंतु ज्या वेगाने पुन्हा कोविडचे रुग्ण वाढीस लागले आहेत, तो वेग पाहता बंद केलेली रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रे पुन्हा खुले करण्याची वेळ शहरावर येऊ शकते.
...
सर्व कोविड केअर केंद्रे बंद
नवी मुंबई शहरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेली १८ ठिकाणची कोविड केअर केंद्रे आणि रुग्णालये बंद केली आहेत. तसेच या ठिकाणचे आरोग्य कर्मचारी इतरत्र हलवण्यास सुरुवात झाली आहे. गरज नसलेल्या ६०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. त्यामुळे ऐन वेळेस पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेला बंद केलेली रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रे खुली करावी लागणार आहेत.
...
जम्बो कोविड केंद्रे ६० टक्के बंद
महापालिकेने वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात १६०० खाटांचे तयार केलेले जम्बो कोविड केअर केंद्र मागील महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. या इमारतीमधील ६० टक्के भाग बंद केला असून ती जागा सिडकोला उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त आयसीयू, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन नसलेल्या खाटांचा काही भाग सुरू आहे.
...
लग्नसराईतील नियम धाब्यावर
कोविडमुळे गेली दोन वर्षे लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश अशा अनेक घरगुती कार्यक्रमांवर गदा आली होती. मग काही महिने सरकारने परवानगी दिली होती; मात्र मर्यादित लोकांच्या उपस्थितीत व नियमांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले होते. त्यामुळे बँड, वरात, जेवणावळींना तिलांजली द्यावी लागली होती. आता सर्वच निर्बंध हटल्याने वाढदिवस, लग्न सोहळे, गृहप्रवेशासारखे कार्यक्रम जंगी साजरे होत आहेत. तोंडावर मास्क नाही, गर्दी आणि सॅनिटाईझर गायब झाल्याने पुन्हा कोविडची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.
...
रुग्णांचा वाढता आलेख
२९ मे -३२, २८ मे - २९, २७ मे - ३२, २६ मे - २१, २५ मे - २०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84017 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top