रमाई आणि डॉ. सविता आंबेडकर यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमाई आणि डॉ. सविता  आंबेडकर यांना अभिवादन
रमाई आणि डॉ. सविता आंबेडकर यांना अभिवादन

रमाई आणि डॉ. सविता आंबेडकर यांना अभिवादन

sakal_logo
By

कल्याण, ता. २९ (बातमीदार) ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर यांना कल्याणमध्ये आदरांजली वाहण्यात आली. सार्वजनिक वाचनालयामध्ये पँथर सुवर्ण महोत्सवी समितीतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी रमाबाई व सविता आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच आंबेडकरी गीतांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रमही या वेळी झाला.

या वेळी ॲड. इंदू वराळे आणि मालती वराळे यांनी रमाबाई व सविता आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग श्रोत्यांना सांगितले. या दोघींच्याही बाबासाहेबांच्या आयुष्यातील सहभागाविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर बेडेकर महाविद्यालयाचे प्रा. दामोदर मोरे यांनी डॉ. सविता यांनी आंबेडकरांसोबत केलेले राजकीय दौरे, त्यांच्या जीवनातील प्रसंगाच्या आठवणी सांगितल्या. डॉ. सविता यांना काही लोकांनी जाणूनबुजून बदनाम केले, असेही मोरे म्हणाले. या कार्यक्रमात इंदू मिल आंबेडकर स्मारकाचे संस्थापक चंद्रकांत भंडारे यांचा सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर अण्णा रोकडे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष शालिनी बहिव यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विद्या शिर्के यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मिलिंद गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84029 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top