चंद्रपाडा-वाकिपाड्याला सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपाडा-वाकिपाड्याला सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळणार
चंद्रपाडा-वाकिपाड्याला सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळणार

चंद्रपाडा-वाकिपाड्याला सूर्या प्रकल्पाचे पाणी मिळणार

sakal_logo
By

विरार, ता. ३० (बातमीदार) ः चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवाशांना तेथील पाझर तलाव आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याबाबत येथील नागरिक आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असता येथील नागरिकांना सूर्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी वसई-विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत येथील नागरिकांना पाणी उपलब्ध होणार आहे.
वाकीपाडा-चंद्रपाडा येथील नागरिकांचे पाण्यावाचून होणारे हाल लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, पालिकेतील माजी सभापती कन्हैया भोईर, पंचायत समिती सदस्या शुभांगी बेंद्रे, बविआचे वाकीपाडा अध्यक्ष अविष्कार पाटील, दर्शना गावडे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीमुळे आमदार ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि पाणी समन्वयक प्रफुल साने, पालिकेचे प्रभारी शहर अभियंता राजेंद्र लाड, सुरेंद्र ठाकरे (उपमुख्य अभियंता पाणी विभाग), केतन राऊत (उपअभियंता पाणी विभाग) यांच्याशी चर्चा करून वाकीपाडाजवळील असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या पाईपलाईनला टॅपची जोडणी ग्रामपंचायतीच्या मेन पाण्याच्या लाईनला करून देण्याचे आदेश दिले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वाकीपाडा येथे जाऊन पाहणी केली. वाकीपाडा व चंद्रपाडा येथील रहिवाशांना नळाद्वारे येत्या दोन दिवसांत पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84051 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top