सॅनिटरी पॅडचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅनिटरी पॅडचे वाटप
सॅनिटरी पॅडचे वाटप

सॅनिटरी पॅडचे वाटप

sakal_logo
By

खारघर (बातमीदार) : मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवण यांच्यातर्फे खारघरमधील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हा अध्यक्ष पद्मा चव्हाण, खारघरच्या अध्यक्षा रेणुका पगारे, खारघर महिला शहर अध्यक्ष राजश्री कदम, तसेच रामदास नारकर, विजय चव्हाण, बळीराम नेटके, सचिन पवार, राहुल कोळी, खारघरमधील महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पद्मा चव्हाण आणि राजश्री कदम यांनी खारघरमधील झोपडपट्टीतील महिलांमध्ये सॅनिटरी पॅडबाबतचे महत्त्व पटवून दिले; तर सुरेश रांजवण यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84064 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top