१२३ महिला होणार व्यावसायिक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२३  महिला होणार व्यावसायिक!
१२३ महिला होणार व्यावसायिक!

१२३ महिला होणार व्यावसायिक!

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेला महिलांनी लघु व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने दिनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियानाकडून ४८ लाख ८० हजार निधी उपलब्ध करू दिला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेतून महापालिकेच्या क्षेत्रातील १२३ महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी प्राप्त झाली आहे. वसई-विरार महापालिकेच्या पूर्वीचे काम उत्तम असल्याने यंदा पालिकेला अधिक अनुदान देण्यात आले आहे.
महिलांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांना व्यवसाय करता यावा याकरिता योजनेचा महापालिकेने पाठपुरावा केला व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ४८ लाख ८० हजार इतका निधी पालिकेला प्राप्त झाला. या व्यवसायात अन्न प्रक्रियेचा समावेश आहे. ज्यात फ्रूट वाईन, मक्याचे पदार्थ, जीवनसत्व पदार्थ फळांचा रस किंवा अन्य खाद्यपदार्थ बनविण्यासाठी फायदा होणार आहे.
या योजनेच्या पात्रतेसाठी फूड लायसन्स असावे हे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यवसायासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. त्याची तपासणी विभागातर्फे करण्यात आल्यावर एकूण १५ महिला बचत गटातील एकूण १२३ महिलांना व्यवसाय करण्यासाठी निधी वाटप केला जाणार आहे. व्यवसाय करायचा आहे, मात्र भांडवल नाही अशा लाभार्थ्यांना याचा लाभ होणार असून, उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.
कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार व व्यवसाय डबघाईला गेले. अद्यापही अनेक कुटुबांची आर्थिक घडी विस्कळित आहे, अशातच महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहनपर निधी प्राप्त झाला असल्याने पुढे आलेल्या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळाले आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेतून वसई-विरार शहरातील महिला बचत गटाला निधी प्राप्त झाला आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. लवकरच आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सूचनेनुसार निधी वितरित करण्यात येणार आहे. महिलांना व्यवसायासाठी चालना, चांगली संधी मिळणार आहे.
- संजय हिणवार, दीनदयाळ अंत्योदय विभाग, शहर अभियान व्यवस्थापक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84074 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top