राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व संस्कृती विभागाच्या प्रमुखपदी देवयानी बेंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व संस्कृती विभागाच्या प्रमुखपदी देवयानी बेंद्रे
राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व संस्कृती विभागाच्या प्रमुखपदी देवयानी बेंद्रे

राष्ट्रवादीच्या साहित्य, कला व संस्कृती विभागाच्या प्रमुखपदी देवयानी बेंद्रे

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ३० (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य, कला व संस्कृती विभागाची मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच देवयानी बेंद्रे यांच्याकडे देण्‍यात आली आहे. आजवर त्यांच्यावरील जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
देवयानी बेंद्रे यांनी आजवर विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय राहत उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण, राखी जाधव, नरेंद्र राणे, साहित्य, कला व संस्कृती विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाबा पाटील यांच्या संमतीने देवयानी बेंद्रे यांची साहित्य व कला संस्कृती विभाग मुंबईच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या पदाचे नियुक्तिपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84082 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top