महिला ही आदिशक्तीचा स्त्रोत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला ही आदिशक्तीचा स्त्रोत!
महिला ही आदिशक्तीचा स्त्रोत!

महिला ही आदिशक्तीचा स्त्रोत!

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) ः आज महिला काही क्षेत्रात पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत. नारीशक्तीची विविध रूपे आपण पाहत असतो. नारीशक्ती ही आदिशक्तीचा स्रोत आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली येथे सुनील चौगुले क्रीडासंकुलात शिवसेनचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी विधवा महिलांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी स्त्री-शक्तीचा गौरव केला.
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना शिंदे यांनी विधवाविवाह आणि सन्मानाच्या कायद्याचा आवर्जून उच्चार केला. सरकारच्या या कायद्यामुळे विधवा महिलांना पुन्हा ताठ मानेने समाजात जगण्याचा अधिकार मिळणार आहे; मात्र आजही काही ठिकाणी महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी त्यांच्या भाषणात धर्मवीर सिनेमाबद्दल सांगताना शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिंदे यांच्या उपस्थितीत विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला दिघा, ऐरोली, रबाळे या भागातील तब्बल चार हजार महिलांनी उपस्थिती लावली होती. या महिलांना विजय चौगुले यांच्या प्रयत्नाने विविध योजनांचे वाटप करण्यात आले. निराधार माता भगिनींच्या मुलांना शिष्यवृत्ती, सरकारी योजना अंतर्गत विधवा पेंशन, बालसंगोपन योजनेचा लाभ, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार आदी योजनांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी सकाळ वृतसमूहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक जगदीश गवते, आकाश मढवी, ममित चौगुले, शिवसेना उपविभाग प्रमुख रेंवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
....
राज्य सरकारतर्फे विविध भागातील महिलांसाठी योजना राबवण्यात आल्या आहेत; परंतु त्या योजनांची माहिती नसल्यामुळे त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात उशीर होत असतो. आम्ही समाजातील वंचित, निराधार आणि विधवा महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दिघा, रबाळे आणि ऐरोली येथील महिलांसाठी राबवलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक महिलेला आधार देण्याचा आम्ही प्रमाणिक प्रयत्न केला आहे.
- विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेते, शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84101 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top