कारमध्ये हत्यारे बाळगणारे त्रिकुट अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारमध्ये हत्यारे बाळगणारे त्रिकुट अटकेत
कारमध्ये हत्यारे बाळगणारे त्रिकुट अटकेत

कारमध्ये हत्यारे बाळगणारे त्रिकुट अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) ः कारमध्ये शस्त्रे घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये वावरणाऱ्या त्रिकुटाला एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तलवार, लोखंडी कटावणी, चॉपर, चाकू अशी हत्यारे व कार जप्त केली आहे. हे आरोपी हत्यारे घेऊन कुठे जात होते, यांचा तपास पोलिस करत आहेत. रझाक शेख (१९), सलमान खलदानिया (२६), शाहीद शेख (२२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एपीएमसी पोलिसांना या त्रिकुटाबाबत माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश शेवाळे, वसिम शेख व त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या सचूनेनुसार पुनित कॉर्नरजवळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच हे तिघे कारने पळ काढत होते. या वेळी कारचा पाठलाग करून पोलिसांनी या त्रिकुटाला अटक केली. कारच्या तपासणीत पोलिसांना तलवार, लोखंडी कटावणी, चॉपर, चाकू, लाकडी रॉड, प्लास्टिक पाईप, लॅपटॉप, डीव्हीआर मशीन, मॉनिटर आदी साहित्य आढळले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84122 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top