एसटीच्या पहिल्या ई-बसचे उद्या लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या पहिल्या ई-बसचे उद्या लोकार्पण
एसटीच्या पहिल्या ई-बसचे उद्या लोकार्पण

एसटीच्या पहिल्या ई-बसचे उद्या लोकार्पण

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० ः महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ दाखल झाली आहे. १ जून रोजी एसटी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त ‘शिवाई’ बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १) पुण्यात पार पडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.
लोकार्पण सोहोळ्यानंतर पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. तत्पूर्वी १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याशिवाय चार्जिंग स्टेशनचेही उद्‍घाटन यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त बालगंधर्व सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
-------------
दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.
- अॅड. अनिल परब, परिवहन मंत्री
-------
दररोज सहा फेऱ्या
लोकार्पणानंतर पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दररोज सहा फेऱ्या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने आणखी इलेक्ट्रिक बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. त्याशिवाय बसची आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला आहे.
-----------
२५ वर्षे विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सत्कार
एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. अपघातविरहित सेवा देणाऱ्या ३० चालकांचा सपत्निक विशेष गौरव केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84149 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top