कल्याण-मुरबाड रस्त्याला शांताराम घोलप यांचे नाव देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-मुरबाड रस्त्याला शांताराम घोलप यांचे नाव देण्याची मागणी
कल्याण-मुरबाड रस्त्याला शांताराम घोलप यांचे नाव देण्याची मागणी

कल्याण-मुरबाड रस्त्याला शांताराम घोलप यांचे नाव देण्याची मागणी

sakal_logo
By

टिटवाळा, ता. ३१ (बातमीदार) ः कल्याण-मुरबाड रस्त्याला कुणबी समाजाचे नेते व ज्यांनी हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला ते माजी महसूल मंत्री शांताराम घोलप यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा कथोरे यांनी दिला आहे. कुणबी ज्ञाती समाज मंडळ यांनी म्हारळ येथे उभारलेल्या भव्य इमारतीचे, विद्यार्थीगृह व सभागृहाचे उद्‍घाटन कथोरे आणि माजी आमदार गोटीराम पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कल्याण-मुरबाड रस्त्याला शांताराम घोलप यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी कुणबी ज्ञाती समाज कल्याण शहर मंडळ अध्यक्ष गोविंद धीर्डे, उपाध्यक्ष कृष्णा खुटारे, शरद लिहे, एकनाथ धानके, कार्याध्यक्ष परशुराम पिंताबरे, सुरेश कापरे, गुरुनाथ विशे, बबन देसले, रवींद्र घोडविंदे, अशोक फनाडे, मंगेश पडवळ, मंगेश बनकरी, अरुण पाटील, गोविंद आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84173 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top