धोकादायक कुंडी धबधबा बुजवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक कुंडी धबधबा बुजवला
धोकादायक कुंडी धबधबा बुजवला

धोकादायक कुंडी धबधबा बुजवला

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३१ (वार्ताहर) : वाजे येथील अभिनेता सलमान खान यांच्या फार्म हाऊसजवळील कुंडी धबधबा वाजे ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या सहकार्याने बुजवण्यात आला.

कुंडी धबधब्याजवळ कोणी जाऊ नये, याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून सदर धबधब्यात उतरतात, परंतु पाण्याचा प्रचंड वेग व मोठ्या भोवऱ्यात ते अडकून राहिल्याने पाण्यात बुडून मृत्यू होतो. दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले व तरुण बुडून मृत्युमुखी पडतात, त्यावर कायमचा प्रतिबंध व्हावा, याकरिता हा धबधबा बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पोलिस उपआयुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनवणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वाजे ग्रामपंचायत कमिटी, मंडळ अधिकारी अजित पवार व वन खात्याचे अधिकारी सोनवणे यांच्या उपस्थितीत भराव टाकण्यात आला.

सदर कुंडी धबधब्यात पावसाच्या पाण्याने मोठा १० ते १५ फुटांचा पाण्याचा भोवरा तयार होतो, तो खड्डा पोकलेन मशीन व नियंत्रित स्फोट करून दगडांचा भराव करून बुजवण्यात आला. त्यामुळे आता तेथे कोणतीही दुर्घटना होणार नाही, असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84179 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top