ठाणे ग्रामीणमध्ये बेकायदा शाळांचे पेव; ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school
ठाणे ग्रामीणमध्ये ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत

ठाणे ग्रामीणमध्ये बेकायदा शाळांचे पेव; ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत

ठाणे - बेकायदा शाळांचे पेव ग्रामीण भागापर्यंत पोहचले असून अशा ३८ शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या अनधिकृत शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश विभागाने संबंधित शाळा प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये असे आवाहनही केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी ग्रामीण तालुक्यांत एकूण ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे या बहुतेक शाळा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. स्वस्तात प्रवेश मिळत असल्याने ग्रामीण भागातील पालक कोणतीही चौकशी न करता केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून येथे प्रवेश घेतात; मात्र या शाळांना मान्यता नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेमार्फत सुरू असलेल्या अनधिकृत प्राथमिक शाळा तात्काळ बंद करून तसे हमीपत्र प्राथमिक शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अनधिकृत शाळा

अंबरनाथ तालुका

गोकुळ कॉन्व्हेंट स्कूल, रेनबो इंग्लिश स्कूल, खरड, श्री समर्थ स्कूल नेकाळी, रुद्रा इंग्लिश मीडियम स्कूल- कांगणी (प.), प्रगती किद्या मंदिर- पाले, सनशाईन इंग्लिश स्कूल- उमरोली.

मुरबाड तालुका

ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, भिवंडी तालुक्यातील एम. एन. तरे इंग्लिश मीडियम स्कूल- धामणगाव, इंग्लिश मीडियम स्कूल- कुंदेफाटा, नॅशनल इंग्लिश स्कूल- दापोडे, लिओ इंटरनॅशनल स्कूल- काल्हेर, लिओ हायस्कूल- काल्हेर, केदिका इंग्लिश मीडियम स्कूल- काल्हेर, द किनर्स इंग्लिश मीडियम स्कूल- कांबे, अकेंचुरा नॅशनल स्कूल- कोन, खान सदरुद्दिन प्रायमरी स्कूल- कारीकली, अग्निमाता इंग्लिश स्कूल- पिंपळास, समर्थ विद्यालय- तलाई पाडार, पिंपळनेर, ईडू स्मार्ट इंग्लिश स्कूल- साकरोली, इकरा नॅशनल स्कूल- पडघे.

कल्याण तालुका

बी. आर. डी. स्कूल- घोटसई, युनिक इंग्लिश मीडियम स्कूल- टिटवाळा, केंन्टगो ग्लोबल पब्लिक स्कूल- गुरकली, राया इंग्लिश स्कूल- राया, नकज्योती बेथनी विद्यापीठ- रुंदे, प्रकाश किड्स स्कूल- खडकली , जी. के. इंग्लिश हायस्कूल- खडकली, सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल- म्हारळ, सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल- म्हारळ, विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, नीलम इंग्लिश स्कूल- नांदीकली, आदर्श विद्यालय लोढा हेकन- निळजे, डीग्नेटी कॉन्व्हेंट स्कूल- कोळेगाव, सरस्वती इंग्लिश स्कूल- दहिसर, आयडिएल इंग्लिश स्कूल- पिंपरी.

शहापूर तालुका

एम. आर. राणे प्राथमिक शाळा- आसनगाव, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल- शेरे, एम. जे. वर्ल्ड स्कूल आदी शाळा या अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84226 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thanecrimeschool
go to top