
युपीएलतर्फे देशात ४०४६ गावे दत्तक
मुंबई, ता. ३१ : कृषी उत्पादने व सुविधा यांची पुरवठादार कंपनी यूपीएल लि.तर्फे शेतकरी कल्याणासाठी अनेक शैक्षणिक व समाजविकास उपक्रम राबवले असून, पुढील वर्षापर्यंत त्यांच्यातर्फे देशभरात एकूण सहा हजार गावे दत्तक घेतली जातील.
यूपीएलने या आर्थिक वर्षात ४०४६ गावे दत्तक घेतली असून तेथील ८.४ लाख एकर शेतजमिनीतील मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेती पद्धती विकसित करणे यावर त्यांनी भर दिला आहे. पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १०० गावे दत्तक घेण्यात आली असून, तेथे पाच हजार झाडेही लावली आहेत. या प्रयत्नांनी राज्यात कांदा, टोमॅटो, उस, द्राक्षे, डाळिंब यांच्या उत्पादनात १५ ते २० टक्के तसेच कापूस व सोयाबिन यांच्या उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ झाली, असे यूपीएलचे भारतीय विभाग संचालक आशिष डोभाल म्हणाले.
पथदर्शी कार्यक्रम सुरू
साप आणि कुत्रा चावल्यास त्यापासून संरक्षण करण्याबाबत भारत सीरमच्या सहकार्याने पथदर्शी कार्यक्रम सुरू आहे. या दत्तक गावांच्या शाश्वत विकासासाठी, कार्बनचे प्रमाण कमी करणे, पाण्याची बचत, वीज बचत आणि ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे यांत्रिकीकरण या नावीन्यपूर्ण पद्धती सुरू केल्या आहेत. धान्य खराब होऊ नये म्हणून कापलेल्या धान्याच्या योग्य साठवणुकीबाबतही शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84240 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..