पोलिसांच्या समुपदेशनासह दातांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या समुपदेशनासह दातांची तपासणी
पोलिसांच्या समुपदेशनासह दातांची तपासणी

पोलिसांच्या समुपदेशनासह दातांची तपासणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त राज्य सरकारच्या शासकीय दंतमहाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे आज मुंबईकरांसाठी विशेष तपासणी शिबिरे भरवण्यात आली होती. पोलिसांच्या समुपदेशनासह दातांची तपासणी करण्यात आली. जवळपास ५० पोलिसांचे तंबाखूविरोधी समुपदेशन करण्यात आले. ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’च्या सहकार्याने कांदिवली आणि गोवंडी परिसरात दातांची तपासणी मोहीम राबवण्यात आली.

गोवंडीत राबवण्यात आलेल्या शिबिरात जवळपास ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील तिघांना कर्करोग होण्यापूर्वीची लक्षणे आढळली. कांदिवली परिसरात झालेल्या शिबिरात एकूण ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १७ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश होता. ज्या रुग्णांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळली, त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मौखिक आरोग्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

पोलिसांसह रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब करत तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती केली. रुग्णांसाठी तोंडाच्या आरोग्यासंदर्भातील प्रदर्शन भरवण्यात आले होते. कर्करोगाच्या दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शनपर माहिती दिली, असे शासकीय दंतमहाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. डिंपल पाडावे यांनी सांगितले.

तंबाखूची वाढती समस्या पाहता समाजात त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर कार्य होणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला वारंवार तंबाखूचे दुष्परिणाम सांगणे आवश्यक आहे. कांदिवली पूर्व भागातील हनुमान नगर वस्तीत सलाम बॉम्बे फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (कांदिवली) आणि मिडवीज हेल्थकेअर कम्युनिकेशन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम, तंबाखू सेवन करणाऱ्यांसाठी मुखतपासणी, समुपदेशन, माता आणि बालकांसाठी तंबाखू पर्यावरणास धोका इत्यादी विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सर्व आयोजकांनी सहभागी झालेल्यांना स्वतः व्यसन न करण्याचा आणि आपले कुटुंब व समाज व्यसनमुक्त राखण्याचा सल्ला दिला. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहायक महाव्यवस्थापक नारायण लाड यांनीही तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले.

‘भुराल’ चित्रफितीतून मार्गदर्शन
विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या ‘भुराल’ नावाच्या एका चित्रफितीचे लोकार्पणही करण्यात आले. ‘भुराल’ चित्रफितीतून तंबाखूच्या दुष्परिणामांमुळे होणारे आजार, व्यसन, शारीरिक आणि मानसिक परिणामांची माहिती देण्यात आली, असे डॉ. डिंपल पाडावे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84249 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top