मराठी ग्रंथ संग्रहालयात भरणार प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी ग्रंथ संग्रहालयात भरणार प्रदर्शन
मराठी ग्रंथ संग्रहालयात भरणार प्रदर्शन

मराठी ग्रंथ संग्रहालयात भरणार प्रदर्शन

sakal_logo
By

ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्रातील सर्वात जुन्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असणाऱ्या ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२९ वा वर्धापनदिन १ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या वेळी साहित्याचा खजिना लाभलेल्या या ग्रंथालयाच्या इतिहासातील काही पाऊलखुणा प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्यात येणार आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वामन रेगे सभागृहात हे प्रदर्शन भरणार असून यात संग्रहालयाच्या दफ्तरातील काही दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रांचा समावेश असणार आहे.

ठाण्यात १९६० मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम, १९६४ मध्ये उभारण्यात आलेल्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याची छायाचित्रे, मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अमृतमहोत्सवाची माहिती पत्रके, संग्रहालयाच्या मदतीसाठी १९५५ सालापासून आयोजित करण्यात आलेले नाट्यप्रयोग, संग्रहालयातील शारदोत्सव, व्याख्यानमाला, भावे जन्मशताब्दी अशा कार्यक्रमांची माहितीपत्रके असा दुर्मिळ खजिना या प्रदर्शनामध्ये रसिकांना पाहता येणार आहे. १ जून रोजी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून ६ जूनपर्यंत हे प्रदर्शन चालू राहील. नागरिकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. रसिक वाचक आणि ठाणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84255 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top