प्रस्थापितांसोबत नवख्यांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रस्थापितांसोबत नवख्यांना संधी
प्रस्थापितांसोबत नवख्यांना संधी

प्रस्थापितांसोबत नवख्यांना संधी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानंतर प्रस्थापितांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले; तर नवख्यांनादेखील संधी मिळण्याच्या अपेक्षेमुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाल्याचे या वेळी दिसून आले. प्रभागांची मोडतोड झाल्याने प्रस्थापितांना इतर प्रभागांतही उभे राहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे नव्या प्रभाग आरक्षणात प्रस्थापितांसोबत नवख्यांनाही संधी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात मंगळवारी (ता. ३१) आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. प्रभागांच्या मोडतोडीमुळे प्रभाग आरक्षणात दिग्गजांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती; मात्र प्रत्यक्षात आरक्षण सोडतीनंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन पैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नरेश मणोरा आणि सिद्धार्थ ओवळेकर यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे, परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मात्र यातील एकाला संधी उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १८ मध्ये दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला किंवा सुहास देसाई यापैकी एकालाच संधी मिळणार आहे, परंतु या ठिकाणी महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डात दोघांपैकी एक जण आपल्या पत्नीला संधी देतील अशी शक्यता आहे.

तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि पुरुष असे आरक्षण आल्याने या ठिकाणी माजी महापौर नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकेल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी उपमहापौर पल्लवी कदम यांना धक्का बसल्याचे दिसून आले आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (महिला) आणि पुरुष असा आरक्षित झाल्याने पल्लवी कदम यांचा पत्ता कट झाला आहे, परंतु त्यांचे पती पवन कदम यांना संधी मिळू शकणार आहे.
---
दिव्यात आरक्षणातही शिवसेनेच्या बाजूने झुकते माप पडल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्रमांक ४३, ४४ आणि ४५ मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडल्याचे दिसून आले. या ठिकाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले आदेश भगत आणि नीलेश पाटील यांनादेखील संधी मिळणार आहे, परंतु शिवसेनेच्या माजी नगरसेवकांपैकी आता कोणाला संधी द्यायची असा पेच शिवसेनेपुढे असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84257 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top