पेट्रोल-डिझेल वितरकांचे आंदोलन मुंबईत यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल-डिझेल वितरकांचे आंदोलन मुंबईत यशस्वी
पेट्रोल-डिझेल वितरकांचे आंदोलन मुंबईत यशस्वी

पेट्रोल-डिझेल वितरकांचे आंदोलन मुंबईत यशस्वी

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : इंधनावरील उत्पादन शुल्ककपातीच्या धोरणाविरोधात मंगळवारी मुंबईसह राज्यभरात पेट्रोल डिलर्स असोसिएशनने खरेदी बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यापूर्वी नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी आधीच इंधनाचा साठा करून ठेवण्यात आल्याने मुंबईत तरी एकही पेट्रोल पंप बंद नव्हता. पंपावरही वाहनचालकांची फारशी गर्दी नव्हती. आज एकाही इंधन कंपनीकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यात आली नसल्याने पेट्रोल-डिझेल वितरकांचे आंदोलन यशस्वी झाल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यभरात काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवल्याचे दिसून आले.

राज्यभरात सुमारे सहा हजार ५०० वितरक आंदोलनात सहभागी झाले होते. २०१७ पासून पेट्रोल-डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये सुधारणा झालेली नाही. सरकार आणि इंधन कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार दर सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाशी कमिशन निगडित केले असूनही त्याची अंमलबजावणी केली गेलेली नाही. २०१७ पासून आजपर्यंत इंधनाच्या किमती मात्र जवळ जवळ दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक खर्च, बँकांचे व्याज, वेतन, वीज बिले, विविध शासकीय शुल्क इत्यादी खर्चही दुप्पट झाला आहे. त्यातच दोन वेळा केंद्राने उत्पादन शुल्कात कपात जाहीर केली. इंधनाच्या किमती सुमारे ८ ते १२ रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे देशभरात सुमारे तीन हजार कोटींचे नुकसान झाले, असा आरोप डिलर्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे पूर्वीची १५ दिवसांनी दर बदलायची पद्धत सुरू करावी, अशी मागणी आंदोलनाच्या निमित्ताने फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84266 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top