ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्याने 
झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : गिरगाव चौपाटी परिसरात शिकाऊ कारचालकाकडून ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर दाबल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. श्रीधर पुजारी (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपी दिनेश केवट (वय ३७) हे गिरगाव चौपाटी परिसरात सकाळच्या वेळी कार शिकत होते. त्या वेळी श्रीधर पुजारी अचानक कारपुढे आल्याने केवट यांनी ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर दाबला. त्यामुळे गाडी वेगात पुढे गेल्याने श्रीधर पुजारी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आरोपी दिनेश केवट यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84287 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top