आईनेच नवजात शिशूला कचऱ्याच्या डब्यात फेकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईनेच नवजात शिशूला कचऱ्याच्या डब्यात फेकले
आईनेच नवजात शिशूला कचऱ्याच्या डब्यात फेकले

आईनेच नवजात शिशूला कचऱ्याच्या डब्यात फेकले

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : कौटुंबिक वादाला कंटाळून आईनेच नवजात शिशूला कचऱ्याच्या डब्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीच्या पंचतारांकित हॉटेलमधील आठव्या मजल्यावर सोमवारी (ता. ३०) दुपारी ही घटना घडली.

पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारी ३४ वर्षीय महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. हॉटेलमध्ये आठव्या मजल्यावर काम करत असताना अचानक तिला प्रसूती कळा येऊ लागल्या. त्याची माहिती महिलेने इतर कर्मचाऱ्यांना दिली नाही. हॉटेलमधील एका खोलीतच महिलेने बाळाला जन्म दिला; मात्र कौटुंबिक वादामुळे आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते मूल हॉटेलच्या कचऱ्याच्या डब्यात टाकून ती तिथून निघून गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या डब्यात बाळाचा रडण्याचा आवाज आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने सर्वत्र चौकशी करत ना. म. जोशी मार्ग पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी आठव्या मजल्यावरील सीसीटीव्ही तपासले असता हॉटेलच्याच एका महिला कर्मचाऱ्याने बाळाला कचऱ्याच्या डब्यात सोडल्याचे दिसून आले. पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिच्याकडे चौकशी केली असता कौटुंबिक वादातून आपण असे कृत्य केल्याची कबुली दिली. संबंधित महिला अनेक दिवसांपासून पतीपासून वेगळी राहते. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात महिलेवर कलम ३१७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेला तात्काळ उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84288 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top