क्रिकेटच्या मैदानातून तंबाखूविरोधी जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटच्या मैदानातून तंबाखूविरोधी जनजागृती
क्रिकेटच्या मैदानातून तंबाखूविरोधी जनजागृती

क्रिकेटच्या मैदानातून तंबाखूविरोधी जनजागृती

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजीनगर येथे युवासेनेतर्फे सोमवार (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान तंबाखूविरोधी जनजागृती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय तंबाखूविरोधी दिनानिमित्त मैदानाच्या कडेने असलेल्या भिंतींवर जनजागृती करणारी घोषवाक्ये लिहिण्यात आली होती. तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंना व परिसरातील तरुणांना मार्गदर्शनदेखील करण्यात आले. क्रिकेटच्या मैदानातून तंबाखूविरोधी जनजागृती करण्याच्या युवासेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्पर्धेचे उद्‍घाटन माजी नगरसेविका समीक्षा सक्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिनेट सदस्य वैभव थोरात, उपविभागप्रमुख अख्तर शेख यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक उपस्थित होते. डेनिस इलेव्हन हा संघ या स्पर्धेचा विजेता; तर अमीर इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला. दरम्यान, ३१ मे हा आंतरराष्ट्रीय तंबाखूविरोधी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तरुणांमध्ये तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनजागृतीचा उपक्रम राबवल्याचे युवानेसेकडून सांगण्यात आले. तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केलेला हा प्रयत्न नक्कीच सफल होईल, अशी खात्री गणेश वाव्हळ यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84302 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top